पंतप्रधान मोदींनाही मोहात पाडणारा 'रेडिओ'!

१३ फेब्रुवारी... हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं रेडिओच्या अविष्काराविषयी हा एक खास रिपोर्ट... 

Updated: Feb 13, 2018, 06:17 PM IST
पंतप्रधान मोदींनाही मोहात पाडणारा 'रेडिओ'!

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर : १३ फेब्रुवारी... हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं रेडिओच्या अविष्काराविषयी हा एक खास रिपोर्ट... 

'नमस्कार! भाईयो और बहनो, आप सून रहे हे विविध भारती....' हे वाक्य ऐकलं की काळ झरझर मागे ओढतो आणि रेडिओच्या जमान्यात घेऊन जातो. विद्युत उपकराणांच्या श्रेणींमधल्या पहिल्या पिढीचं हे लोकप्रिय प्रसारमाध्यम... जगातला पहिला रेडिओ १८९५ मध्ये इटलीमध्ये गुगलैल्मो मार्कोनीनं तयार केला.... तेव्हा ते साधं बिनतारी संदेशवहनाचं यंत्र होतं.


 जागतिक रेडिओ दिन

रेडिओनं प्रसार माध्यम क्षेञात क्रांती घडवली. इतिहासातल्या महायुद्धापासून ते शीत युद्धापर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना या रेडिओनंच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या... क्रिकेटचे सामनेही या रेडिओमुळेच अनुभवता आले... भारतात १९२३ साली देशात रेडिओचं प्रक्षेपण सुरू झालं. याच रेडिओनं आवाजाचे अनेक बादशाह तयार केले.

'युनेस्को'नं १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करायचा ठरवलं. टीव्ही, संगणक आणि अगदी आज सोशल मीडियाच्या काळातही रेडिओ अजून त्याचं अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळेच की काय पंतप्रधानही 'मन की बात' सांगण्यासाठी रेडिओचीच निवड करतात.