लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर रेल्वे पोलिसांची कारवाई

लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर कल्याण रेल्वे स्थानकात आज रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. 

Updated: Sep 14, 2017, 09:43 AM IST
लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर रेल्वे पोलिसांची कारवाई

कल्याण : लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर कल्याण रेल्वे स्थानकात आज रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. 

लोकलमधील जागेवरुन बुधवारी डोंबिवलीतून आलेल्या महिलेला मारहाण झाली होती. याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

दाखल केलेल्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी आज सापळा रचत १५ ते २० महिलांना ताब्यात घेतले. कल्याण स्थानकासह बदलापूर, अंबरनाथ या स्थानकातही जागा अडवणाऱ्यावरुन लोकलच्या डब्यांमध्ये नेहमी वाद होत असतात. अनेकदा तर हे वाद हाणामारीवर येऊन पोहोचतात.