भाजपाने सत्तेचा दूरूपयोग करू नये - राज ठाकरे

कर्नाटकमधील राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: May 16, 2018, 03:00 PM IST

अलिबाग : कर्नाटकमधील राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि जेडीएसनं बहुमताचा आकडा गाठलेला असताना भाजप सत्तेचा दुरूपयोग करून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपचे असल्यामुळे ते भाजपलाच मदत करणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्या भाजपचीही सत्ता जाणार आहे हे त्यांनी विसरु नये. अशा वेळी नव्यानं येणाऱ्या सरकारमार्फत भाजपची देखील इडी मार्फत चौकशी होऊ शकते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, 'जिस की लाठी उस की भैंस'

'कर्नाटकाचे राज्यपाल मुळात गुजरातचे आहेत. मला जी माहिती मिळाली, त्याप्रमाणे २००१ मध्ये त्यांनी मोदींसाठी राजकोटची जागासोडली होती, त्यांच्यामुळे ते नरेंद्र मोदी यांच्या गुडबू्क्समधील राज्यपाल आहेत. ते भाजपच्या फेवरमध्येच काम करणार आहेत, दुसरीकडे जेडीएस आणि काँग्रेसकडे बहुमत आहे, त्यांचं सरकार बनतंय, मग त्यांना का नाही सरकार बनवण्यासाठी आमंत्रण नाही दिलं. मग तोच न्याय मणीपूर आणि गोव्यामध्ये किंवा मेघालयमध्ये का नाही लावला, हे असं चाललंय, 'जिस की लाठी उस की भैस', हे काही बरोबर नाही चाललंय, जे काही देशात चाललंय आता, मागे मी माझ्या भाषणात म्हटलं होतं, जे कोणतं सरकार सत्तेत येतं, ते सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करतं, पण या वेळी चुकीचे पायंडे पाडले जाऊ नयेत. उद्या काँग्रेसचं सरकार आलं की ते देखील तसंच वागतील, या पाडलेला पायंडा योग्य आहे?', का देशाच असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.