सर्वांनी एकत्र या, राज ठाकरेंचं नाणार रहिवाशांना आवाहन

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत मनसे असेल, असं आश्वासन राज ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलंय.

Updated: Jan 13, 2018, 01:50 PM IST
सर्वांनी एकत्र या, राज ठाकरेंचं नाणार रहिवाशांना आवाहन

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांसोबत मनसे असेल, असं आश्वासन राज ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलंय.

राज ठाकरे यांनी आज नाणारवासियांनी भेट घेतली. रिफायनरीला विरोध करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहायला हवं, असा सल्लाही त्यांनी स्थानिकांना दिला.

जमिनी विकण्याचे बंद होत नाही तोपर्यंत कोकणावर प्रकल्प लादलेच जातील, असंही राज म्हणालेत.  

नाणार प्रकल्पावरून कोकणात राजकीय वातावरण तापलेलं असताना आता राज ठाकरेंनीही यात उडी घेतलीय.

त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्द मनसे विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष इथं पाहायला मिळू शकतो.