आमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली, राज ठाकरेंनी मंत्र्यांना सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी मंत्री गिरीश बापट यांना सुनावले.

Updated: Nov 10, 2017, 06:32 PM IST
आमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली, राज ठाकरेंनी मंत्र्यांना सुनावले

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना सुनावले, आमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली. त्यावेळी बापट यांनी जेव्हा प्रकरण सरकारकडे येईल तेव्हा बघू, असा दिलासा राज यांना दिला.

मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांना आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. या संदर्भात राज ठाकरे यांनी बापट यांच्याशी चर्चा करताना तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची वाट लावली, असा शब्द प्रयोग केला. 

त्यावर हे प्रकरण अजून न्यायालयीन आहे. सरकारकडे आले नसल्याचं स्पष्टीकरण बापट यांनी दिले. यावेळी बापट यांनी जेव्हा प्रकरण सरकारकडे येईल तेव्हा बघू, असा दिलासा राज यांना दिला.

दरम्यान, राज ठाकरे यांनी समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचा प्रखर विरोध मोडून सरकार समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करत असल्याची गाऱ्हाणी यावेळी शेतक-यांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडली. 

यावेळी ज्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात केवळ तेच शेतकरी आंदोलन करतात. उर्वरीत शेतकरी कुठे आहेत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.  सर्व शेतकरी एकत्र येत नाही तोपर्यंत लढा पुढे जाणार नाही सल्ला राज ठाकरेंनी दिला. तसंच शेतकऱ्यांना एकजूट दाखवून लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले.