कथानक चोरल्याचा गुन्हा : राम गोपाल वर्मा औरंगाबाद सत्र न्यायालयात

गुन्ह्याच्या सुनावणीसाठी राम गोपाल वर्मा औरंगाबादच्या सत्र न्यायालयात हजर.

Updated: Sep 6, 2018, 07:37 PM IST
कथानक चोरल्याचा गुन्हा : राम गोपाल वर्मा औरंगाबाद सत्र न्यायालयात

औरंगाबाद : चित्रपटाचे कथानक चोरी प्रकरणाच्या गुन्ह्यात निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना औरंगाबाद सत्र न्यायालयात हजर राहावे लागले. वर्मा याच्यावर औरंगाबाद येथील मुस्तक मोहसीन मुबारक हुसेन यांनी लिहिलेल्या 'जंगल मैं मंगल'चे  कथानक चोरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी राम गोपाल वर्मा औरंगाबादच्या सत्र न्यायालयात हजर होते. 

राम गोपाल वर्मा याला न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं होत. २००९ मध्ये राम गोपाल यांचा 'अज्ञात' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटात वापरलेली कथा आपली होती. ती १९९४ मध्येच लिहिली असे मुस्ताक मोहसीन यांनी सांगत २०१० मध्ये औरंगाबाद सत्र न्यायालयात धाव घेतली होती. 

या प्रकरणी न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांच्यावरील अजामीनपात्र वारंट रद्द केल असले तरी पुढील सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र या तारखेला आपण उपस्थित राहू शकत नसल्याची विनंती राम गोपाल वर्मा यांनी केली असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close