'लाईट बिल वेळेवर न आल्यामुळे भरलं नाही'

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अडीच लाख रुपयांचं लाईट बिल थकवल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

Updated: Aug 13, 2017, 06:56 PM IST
'लाईट बिल वेळेवर न आल्यामुळे भरलं नाही'

औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अडीच लाख रुपयांचं लाईट बिल थकवल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. मी कुठलंही लाईट बिल थकवलं नाही. बिल वेळेवर न आल्यामुळे भरता आलं नाही. लाईटचं हे बिल काल भरलं आहे. ही खोडसाळ बातमी बदनामी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले.

दानवे यांनी 22 मार्च 2017 पासून वीज बिल थकवल्याची माहिती समोर आली होती. दानवे यांच्याकडे जुलै महिन्याची थकबाकी 29 हजार 595 इतकी असून एकूण थकबाकी 2 लाख 59 हजार 176 इतकी होती.