क्रीस्टल थेरपीच्या नावाखाली तरूणीवर बलात्कार

क्रीस्टल थेरपीच्या नावाखाली २० वर्षांच्या तरूणीवर बलात्कार करणाऱ्या प्रख्यात फेंगशुई मास्टर आणि क्रीस्टल थेरपिस्टला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Nov 3, 2017, 10:22 AM IST
क्रीस्टल थेरपीच्या नावाखाली तरूणीवर बलात्कार title=

ठाणे : क्रीस्टल थेरपीच्या नावाखाली २० वर्षांच्या तरूणीवर बलात्कार करणाऱ्या प्रख्यात फेंगशुई मास्टर आणि क्रीस्टल थेरपिस्टला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. डिप्रेशनच्या उपचाराच्या नावाखाली २० वर्षीय तरूणीवर अत्याचार करणारा हा आरोपी देशाविदेशात उपचार करतो. त्याचं नाव चारूहास नाईक असं आहे.

घोडबंदर रोडवर त्याचा फ्लॅट आहे. अभ्यासात हुशार असलेली एक मुलगी मध्यंतरी नैराश्येच्या गर्तेत अडकली होती. पीडित मुलगी मुलुंडमध्ये राहत असून वडील सीए आहेत. तर आई शास्त्रज्ञ आहे. ही मुलगी अभ्यासात हुशार आहे. मात्र ती डिप्रेशनमध्ये गेल्याने नाईक हा तिच्यावर क्रिस्टल थेरपी करत होता. ३० ते ४० टक्के तिला बरे वाटले.

मात्र पुन्हा ही मुलगी थेरपी करण्यासाठी घोडबंदर रोडवरील नाइकच्या फ्लॅटवर आईसोबत आली होती. मात्र आईला काम असल्याने आई मुलीला त्याठिकाणी सोडून निघून गेली. तर तुमच्या मुलीला घरी आणून सोडतो असे नाईक म्हणाला होता. त्याचदरम्यान नाईकने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीनेच मुलीला तिच्या घरी आणून सोडले होते. ३० ऑक्टोबर रोजीचा हा प्रकार घडला आहे.