नाणार प्रकल्पाविरोधातल्या बैठकीत हाणामारी

राजापूरमधल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधातील वाद पुन्हा पेटला आहे.

Updated: Jan 14, 2018, 04:42 PM IST
नाणार प्रकल्पाविरोधातल्या बैठकीत हाणामारी

रत्नागिरी : राजापूरमधल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधातील वाद पुन्हा पेटला आहे.

नाणार रिफायनरी प्रल्कल्पविरोधी बैठकीत एका व्यक्तीला ग्रामस्थांकडून चोप देण्यात आला आहे.

कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती मुंबई यांनी राजापूरच्या कुंभवडे हायस्कूलमध्ये ही बैठक आयोजीत केली होती. दरम्यान चोप मिळालेला व्यक्ती दलाल असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय.

यावेळी त्या व्यक्तीविरुद्ध दादागिरीचा प्रयत्न करण्यात आला असाही आरोप करण्यात येतोय. 

दादागिरी केल्यामुळे कुंभवडे येथील महिलांनी या व्यक्तीला मारहाण केलीय अशीही माहिती मिळतेय.

नाणार प्रकल्पाविरोधातल्या बैठकीत हाणामारी