रत्नागिरीतल्या रोमियोला छेडछाड महागात, मुलीनं चपलेनं मारलं

रत्नागिरीतल्या एका रोमियोला मुलीची छेडछाड काढणं चांगलंच महागात पडलं.

Updated: Sep 11, 2018, 03:23 PM IST
रत्नागिरीतल्या रोमियोला छेडछाड महागात, मुलीनं चपलेनं मारलं

रत्नागिरी : रत्नागिरीतल्या एका रोमियोला मुलीची छेडछाड काढणं चांगलंच महागात पडलं. हा रोमियो फेसबुकवर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मेसेंजरद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. त्यानं अशा पद्धतीनं एका मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीनं या रोमियोचे प्रताप आपल्या घरच्यांना सांगितले. त्यांनी त्या रोमियोला एका ठिकाणी बोलावलं आणि त्याला सगळ्यांच्या समोर माफी मागायला लावली. एवढंच नव्हे तर त्याची खेटरानं यथेच्छ धुलाई देखील केली. हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी काही महिला आपल्या नातेवाईकांसह त्या रोमियोच्या घरी गेल्या. त्यांनीही त्याला चांगलाच प्रसाद दिला.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close