वाशीमध्ये रिले सिंगिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड

नवी मुंबईतल्या वाशीमध्ये रिले सिंगिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड केला गेला. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटातल्या गाण्याला, 327 गायकांनी रिले पद्धतीने गाऊन हा विश्वविक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. 

Updated: Aug 17, 2017, 11:28 AM IST
वाशीमध्ये रिले सिंगिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईतल्या वाशीमध्ये रिले सिंगिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड केला गेला. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटातल्या गाण्याला, 327 गायकांनी रिले पद्धतीने गाऊन हा विश्वविक्रम केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. 

अंध व्यक्तींना प्रकाश देणारे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यात येत आहे. डॉक्टर तात्याराव लहाने अंगार, पॉवर इज विदीन असं या चित्रपटाचं नाव असून, ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटातलं काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू, उंच भरारी घेऊ हे गाणं तब्बल 327 जणांनी रिले पद्धतीने गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केला. याआधी रिले सिंगिगचा वर्ल्ड रेकॉर्ड 296 जणांनी केला होता. 

या विक्रमासाठी या गायकांनी 100 दिवस तयारी केली होती. विराग वानखेडे यांनी हा चित्रपट काढला असून, त्यांनीच हा  रेकॉर्ड करण्यासाठी तयारी केली. यासाठी 18 जिल्ह्यांतून स्पर्धक निवडले गेले. 

या आधी वीराग वानखेडे यांनी गाण्याच्या माध्यमातून इतरही वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. या कर्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.