संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ...

संभाजी भिडे आंबा अपत्यप्राप्तीच्या वक्तव्यामुळे अडचणीत...

Updated: Jun 13, 2018, 09:09 AM IST

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुत्रप्राप्तीबाबतीत केलेल्या वकव्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. पुणे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांचे नाशिक महापालिकेच्या आरोग्याविभागाला देण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाला सखोल चौकशीचे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार चौकशी करुन नाशिक महापालिका उद्यापर्यंत अहवाल सादर करणार  आहे. 

वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून देणे संभाजी भिडे यांच्यासाठी नवे नाही. पण, वादग्रस्त विधानांच्या मालिकेत आता त्यांनी भलतेच अवैज्ञानिक विधान केले आहे. आंबा खाऊन मूल होतं, असा अजब शोध संभाजी भिडे यांनी लावला आहे. संभाजी भिडे हे  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आहेत.

दरम्यान, संभाजी भिडे हे केवळ एक विधान करून थांबले नाहीत. तर त्यांनी आंब्याच्या माध्यमातून अनेकांना अपत्य प्राप्ती करुन दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिक येथील मेळाव्यात ते बोलत होते. मूल होत नसेल तर आंबा खाऊन मूल होते. इतकेच नाही तर केवळ मुलगाच हवा असेल तर तेही शक्य करून दाखविले आहे. तसेच, अनेक दाम्पत्याला मुलगा मिळवून दिला  असल्याचा दावाही संभाजी भिडे यांनी नाशिकच्या मेळाव्यात केला आहे.

या विधानामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close