संभाजी निलंगेकर पाटील यांच्या माजी अंगरक्षकाला अविनाश चव्हाण यांच्या हत्येची सुपारी

लातूरच्या अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. 

Updated: Jun 26, 2018, 10:56 PM IST

लातूर : लातूरच्या कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांचा एकेकाळी अंगरक्षक असलेल्या करण सिंहनं सुपारी घेतल्याचं पुढं आलंय. सध्या लातूरमध्ये वास्तवास असलेला करण सिंह हा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रहिवासी आहे. करण सिंह याला ही सुपारी देण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे हा करणसिंग लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा खाजगी अंगरक्षक म्हणून अनेक दिवस काम करीत होता.

पालकमंत्र्यासोबत त्याचे अनेक फोटो हे आजही फेसबूकवर आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेले महेशकुमार रेड्डी आणि शरद घुमे या दोन मध्यस्थांकडून साडे आठ लाख रुपयेही करणसिंहला देण्यात आले होते. त्यानंतर आपला साथीदार अमोल शेंडगेच्या मदतीनं करण सिंहनं अविनाश चव्हाणवर लातूरच्या शिवाजी शाळेजवळ गोळीबार केला. ज्यात अविनाश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. करण सिंह याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय.