वाळू माफियांची तलाठ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

गोदावरी नदीतून बेकायदेशीर पणे वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला बेदम मारहाण करीत ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार गेवराई तालुक्यात घडल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

Updated: Jun 30, 2018, 09:15 PM IST
 title=

बीड : गोदावरी नदीतून बेकायदेशीर पणे वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला बेदम मारहाण करीत ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार गेवराई तालुक्यात घडल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

गेवराई तालुक्यातील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आम्लेकर यांनी सेलू शिवारात वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर पकडले. त्याच्यावर जप्तीची कारवाई केली. त्यावेळी बंडू घातूळ याने आम्लेकर यांना ट्रॅक्टर मधून खाली ओढत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल कार्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे.