वऱ्हाडाचा टेम्पो पलटी; १५ जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

.....

Updated: Jun 18, 2018, 03:53 PM IST

सांगली: लग्नाचे वऱ्हाड घेऊन निगालेल्या टेम्पोला झालेल्या अपघातात १५जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सांगली जिल्ह्यात घडली. सांगलीतील शिराळा तालुक्यातील धमावडे गावातून हे वऱ्हाड आष्टा येथे लग्नासाठी निघाले होते. दरम्यान, टेम्पोला अपघात घडला. जखमींना इस्लामपूर ग्रामीण आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.