संघर्षाला हवी साथ : शेतमजुरी करून नितीननं मिळवले ९५.२० टक्के

'संघर्षाला हवी साथ'मध्ये संघर्ष अमरावतीच्या नितीन भावेचा... 

Updated: Aug 3, 2018, 04:47 PM IST

राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती : अभ्यास का झाला नाही, याची शंभर कारणं देणं त्याच्यासाठी शक्य होतं... पण असं न करता त्यानं या परिस्थितीला हरवत जिंकून दाखवलं. घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य, राहायला जेमतेम एक छोटीशी खोली... घरात शिक्षणाचा कुठलाही गंध नाही, आई - वडील शेतमजूर, हाताला काम मिळालं तर चूल पेटते, अशी परिस्थिती... अशा परिस्थितीत अमरावतीतल्या नितीनलाच घरची आर्थिक आघाडी सांभाळावी लागली. तोही शेतात शेतमजूर म्हणून जावू लागला... रोज शेतीचं काम करुन शाळा सांभाळत नितीननं अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ९५.२० टक्के मिळवले.  

आर्थिक अडचणींमुळे नितीनच्या मोठ्या भावाचं शिक्षण सुटलं, पण आता नितीनचं शिक्षण सुटायला नको, अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे. नितीननं कुठलीही शिकवणी न लावता दहावीचा अभ्यास केलाय.

नितीनला सीए व्हायचंय... त्याच्या भावाचं आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सुटलंय... नितीन हुशार आहे, त्याच्या बाबतीत असं व्हायला नको, म्हणूनच त्याच्या पाठिशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे... त्याला मदत करण्यासाठी पुढे या...

परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...  

तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा

संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६

पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 

ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 

लोअर परळ, मुंबई - ४०००१३

ई-मेल : havisaath@gmail.com