सॅनिटरी नॅपकीनला जीएसटी लावल्याने निषेध

बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसने नाका कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटून जीएसटी निषेध केला. सॅनिटरी नॅपकीन ही महिलांसाठी गरजेची वस्तू आहे. 

Updated: Jun 30, 2017, 12:49 PM IST
सॅनिटरी नॅपकीनला जीएसटी लावल्याने निषेध title=

बदलापूर : बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसने नाका कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटून जीएसटी निषेध केला. सॅनिटरी नॅपकीन ही महिलांसाठी गरजेची वस्तू आहे.

समाजातील प्रत्येक महिलेला याची आवश्यकता असते. मात्र याचा विचार न करता केंद्र सरकारने यावर 18% कर आकारला आहे,सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या महिला बचत गटांना यातून सूट दिली आहे.

मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतके महिला बचत गट सॅनिटरी नॅपकिन बनवतात. त्यामुळे फायदा सर्वसामान्य महिलांना मिळत नाही, याचा निषेध करण्यासाठी आज बदलापूरच्या नाका कामगार महिलांना राष्ट्रवादीच्या महिलांनी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केलं. यावेळी सॅनिटरी नॅपकिन वगळावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली.