राईनपाडा हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला अटक

व्हिडिओ बनवणाऱ्याचीही होणार चौकशी

Updated: Jul 6, 2018, 12:05 PM IST
राईनपाडा हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला अटक title=

धुळे : राईनपाडा हत्याकांड प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिरालाल गवळी याला वाटवी गावातून अटक करण्यात आली आहे. एलसीबीने या दुसऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 25 जणांना अटक झाली आहे. तर मोबाईल क्लिप काढणाऱ्याची देखील पोलीस करणार असल्याचं समजतं आहे.

रविवारी सकाळी धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात मुलांना पळवणारी टोळी समजून जमावानं पाच जणांना बेदम मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षात हे पाच जण सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातून भिक्षा मागण्यासाठी  रानाईनपाड्य़ात आले होते.