सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचा जोरदार धक्का, यांनी केला प्रवेश

राष्ट्रवादीचा सांगली महापालिकेत भाजपला जोरदार धक्का 

Updated: Jun 16, 2018, 06:13 PM IST
सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचा जोरदार धक्का, यांनी केला प्रवेश title=

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने सांगली महापालिकेत, भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि नगरसेवक धनपाल तात्या खोत आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ. सुलोचना खोत यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खोत नगरसेवक दाम्पत्या बरोबर ६० कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. 

कुपवडचे ज्येष्ठ नेते धनपाल तात्या खोत आणि त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना खोत हे दोघे ही विद्यमान नगरसेवक आहेत. सांगली आणि मिरजच्या मनाने कुपवाडचा विकास होत नाही, शिवाय आमदार गाडगीळ आणि आमदार खाडे यांचा आमदार निधी सुद्धा कुपवाडला मिळत नाही, असा आरोप करत खोत पती पत्नी यांनी मागील महिन्यात भाजपाला रामराम ठोकला होता.

धनपाल तात्या खोत हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. आता पर्यंत कुपवाड शहरावर त्यांचं वर्चस्व राहिले आहे. १९७८ पासून कुपवाड नगरपालिका आणि त्यांनतर १९९८ साली सांगली महापालिका झाल्यापासून सातत्याने धनपाल खोत हे निवडून येत आहेत. यापूर्वी ते कुपवाडचे नगराध्यक्ष होते, सांगली महापालिकेचे ते स्थायी समितीचे सभापती सुद्धा होते. कुपवाड मधील ८ प्रभागात खोत यांचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी परिणाम व्होवू शकतो.