शरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

Updated: Nov 15, 2017, 08:39 AM IST
 शरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर   title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

१५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या दौऱ्यात ते गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत..

शरद पवार या दौर्‍यादरम्यान १७ नोव्हेंबरला यवतमाळ मधील फवारणी बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेटही घेणार आहेत. आज शरद पवार यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल तेथून लगेच ते गडचिरोलीला रवाना होतील.