...तर बारामतीची साखर तोंडात घालेन, पवारांचा टोला

पावसानं दडी मारल्यानं राज्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय.. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे.. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आहेत.. त्यानी काल सांगितले की काही भागात पाऊस चांगला पडेल. हे त्यांचे म्हणणं खरे ठरले तर त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन असं आज माजी कृषी मंत्री शरद पवारांनी म्हटलंय. 

Updated: Aug 19, 2017, 07:12 PM IST
...तर बारामतीची साखर तोंडात घालेन, पवारांचा टोला title=

बारामती : पावसानं दडी मारल्यानं राज्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय.. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे.. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आहेत.. त्यानी काल सांगितले की काही भागात पाऊस चांगला पडेल. हे त्यांचे म्हणणं खरे ठरले तर त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन असं आज माजी कृषी मंत्री शरद पवारांनी म्हटलंय. 

जागतिक मधमाशी दिवस आणि कृषि विज्ञान केंद्राच्या रौप्य वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज पवार बारामतीत होते.  

त्यावेळी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबतही आपण असमाधानी असल्याचं त्यांनी नमूद केलं.  यावेळी पवारांच्या हस्ते मधूसंदेश प्रकल्पाअंतर्गत उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले.