भाजपला धडा शिकविण्यासाठी शरद पवारांची नवी चाल

देशात भाजपविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. आता राष्ट्रवादीनेही दंड थोपटले आहेत.

Updated: Jun 7, 2018, 07:57 PM IST
भाजपला धडा शिकविण्यासाठी शरद पवारांची नवी चाल title=

मुंबई : भाजप आणि शिवसेनेत सध्या आलबेल दिसून येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि दोन तास बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये जाऊन जनतेचे आभार मानले. यावेळी श्रीनिवास वनगा यांना तू लढ. मी पाठिशी आहे. आगामी लोकसभा आपण जिंकू असा दावा केलाय. त्यामुळे शिवसेनेने भाजपला इशारा दिलाय.  दरम्यान, देशात भाजपविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. आता राष्ट्रवादीनेही दंड थोपटले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी समन्वय साधला असता, तर वेगळा निर्णय लागला असता, असे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण पदवीधर मतदार संघात ठाकूर यांचे सहकार्य घेण्याचे सूतोवाच बुधवारी केलेय. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नवे संकेत

पदवीधर मतदार संघासाठी राष्ट्रवादीने आपली फिल्डींग लावली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा आसरा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीने निरंजन डावखरे यांना आपला हिसक्का दाखविण्यासाठी आणि भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा गळ घातल्याचे संकेत मिळत आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्याशी समन्वय साधला असता, तर वेगळा निर्णय लागला असता, असे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण पदवीधर मतदार संघात ठाकूर यांचे सहकार्य घेण्याचे संकेत दिलेत.

 भाजपला सत्तेचा माज 

यावेळी पवापर यांनी केंद्र आणि राज्यातील सत्तेचा भाजपला माज आल्याची टीकाही केली. कोकण पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्यासाठी घेतलेल्या विविध पक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुल्ला यांना काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी आणि आरपीआय (कवाडे गट) यांनी पाठिंबा दिला आहे. पारदर्शक निवडणुकीच्या तत्त्वाला भाजपकडून हरताळ फासल्याचे पालघर आणि भंडारा-गोंदिया येथील पोटनिवडणुकीत समोर आले. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. सत्ता आल्यावर माजायचे नसते, या तत्त्वाचा भाजपाला विसर पडला आहे, असा घणाघात पवार यांनी केला.

भाजपकडून असा दबाव

भाजपला विरोध करणाऱ्यांची चौकशी लावायची. विरोधी पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारावर दबावाचा प्रयत्न झाला. परंतु तो तेथील मतदारांनी झुगारला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या आमदारांवर खटले भरण्यात आले आहेत. चिदंबरम यांच्यासारख्या देशाच्या माजी मंत्र्यांवर दबावतंत्राचा अवलंब करून, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला, अशी माहिती यावेळी पवार यांनी दिली.

निवडणूक आयोगाच हास्यास्पद दावा

लोकसभेच्या भंडारा-गोंदिया येथील पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी १८० मतदानयंत्रात बिघाड झाला. उन्हामुळे हा बिघाड झाल्याचा हास्यास्पद दावा निवडणूक विभागाने केला. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले असेल, तर ते लोकशाहीला घातक आहे, असा धोक्याचा इशारा पवार यांनी दिलाय. पदवीधर मतदार संघासाठी २५ तारखेला मतदान आणि २८ला मतमोजणी होणार आहे.