भिवंडीत मतदानाला गालबोट, शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राडा

ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आज मतदानाला सुरू आहे. पण भिवंडीत या मतदानाला गालबोट लागलं. कालेर भागात मतदानाच्या वेळी शिवसेना आणि भाजपचे 

Updated: Dec 13, 2017, 01:29 PM IST
भिवंडीत मतदानाला गालबोट, शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राडा title=

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणूकांसाठी आज मतदानाला सुरू आहे. पण भिवंडीत या मतदानाला गालबोट लागलं. कालेर भागात मतदानाच्या वेळी शिवसेना आणि भाजपचे 
कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूनं जोरदार बाचाबाची झाली. त्यातूनच पुढे वाद वाढत गेल्यानं हाणामारी झाली.

पोलिसांचा लाठीचार्ज

जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 106 गणांसाठी हे मतदान होत आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांत हे मतदान होत आहे. तर उद्या मतमोजणी होणार आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीतही  मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणत आहे.मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.

भाजपकडून पैशाचे वाटप?

जिल्हा परिषदेचे 83  उमेदवार तर पंचायत समितीसाठी 636 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.तालुक्यातील विविध मतदारसंघात एकूण 636 मतदान केंद्र आहेत. काल शहापूर तालुक्यात पैसे वाटत असल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्याचा प्रकार घडला होता या साठी मोठा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलसी बंदोबस्त ठवण्यात आला आहे .