शिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी नाही - अशोक चव्हाण

  शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी होऊ शकत नसल्याची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. 

Updated: Jan 30, 2018, 06:29 PM IST
शिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी नाही - अशोक चव्हाण title=

सातारा :  शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी होऊ शकत नसल्याची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. 

भाजपचा पराभव करण्यासाठी..

राज्यात शिवसेनेसोबत आघाडीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय. भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसोबत यायचे असल्यास हायकमांडशी चर्चा करावी लागेल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. आघाडीसंदर्भातले सर्व निर्णय दिल्लीत होतात त्यामुळं दिल्लीतच या बाबत निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. 

सेना-भाजप सोबतच!

मात्र भाजप शिवसेनेची कोणत्याही परिस्थितीत साथ सोडणार नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून भाजप शिवसेनेला सोबत ठेवतीलच असंही पृथ्वीराज चव्हाणांनी नमूद केलंय.  सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला हरवणे सोपे होईल असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबादेत केले.

समविचारी यांना सोबत घेणार

भाजप शिवसेनेला सोडेल असं वाटत नाही, मात्र शिवसेनेनं स्वतंत्र लढण्याची घोषणा केली तरी साम दाम दंड भेट वापरून भाजप शिवसेनेला सोबत ठेवीलच, असे चव्हाण म्हणालेत. काँग्रेस सगळे समविचारी पक्ष घेऊन पुढं जाणार, चर्चा सुरु आहे, की शिवसेना काँग्रेस सोबत येणार मात्र यात काही तथ्य नाही, आणि शिवसेनेला सोबत यायचं असेल तर याचा निर्णय मी घेऊ शकत नाही ते आमच्या पक्ष प्रमुखसोबत बोलून निर्णय घेऊ शकतात असंही चव्हाण म्हणाले.