'शिवसेनेचे हातही भ्रष्टाचारात गुंतलेले'

भाजप शिवसेना युतीचं सरकार हे रडीचा डाव खेळत आहे. या सरकारच्या काळात लोकशाही मार्गाने कुठलीही काम होत नाही. 

Updated: Aug 13, 2017, 05:20 PM IST
'शिवसेनेचे हातही भ्रष्टाचारात गुंतलेले'

इंदापूर : भाजप शिवसेना युतीचं सरकार हे रडीचा डाव खेळत आहे. या सरकारच्या काळात लोकशाही मार्गाने कुठलीही काम होत नाही. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. तसंच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे हात भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी इंदापुरात केली.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच या दोघांचाही राजीनामा मागीतला.

राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बरबटलेले आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी विरोधकांवर केला आहे.