धक्कादायक! शेतकऱ्यांचा निधी परदेश दौरे, शासकीय जाहीरातींवर खर्च

राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सराकरने दिलेला निधी परदेश दौरे आणि शासकीय जाहीरातीसाठी वापरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Updated: Jun 29, 2017, 05:18 PM IST
 title=

यवतमाळ : राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सराकरने दिलेला निधी परदेश दौरे आणि शासकीय जाहीरातीसाठी वापरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

यवतमाळ आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात. त्यामुळे या दोन जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने बळीराजा चेतना योजना राबवली. या दोन्ही जिल्ह्यात या योजनेतील निधी दुसऱ्याच कामांसाठी खर्च केल्याचं माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.

राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यात होतात. त्यामुळे सरकारने या दोन जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी २४  ऑगस्ट २०१५ पासून बळीराजा चेतना योजना राबवण्याचा निर्णय घेतला.

ही योजना राबवण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांना दरवर्षी १० कोटी रुपये निधी दिला जातो. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी दिलेल्या या निधीचा वापर परदेश दौरे आणि जाहिरातबाजीसाठी वापरण्यात आलाय.