श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार, श्रीराम समुद्र याला अटक

श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला अखेर अटक करण्यात आलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2018, 05:59 PM IST
श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार, श्रीराम समुद्र याला अटक title=

बदलापूर : श्रीराम इन्व्हेस्टमेंट गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीराम समुद्र याला अखेर अटक करण्यात आलीय. सुमारे वर्षभरापूर्वी हा ३०० ते ४०० कोटी रूपयांचा गैरव्यवहार उजेडात आला होता.

 ४ हजारांची फसवणूक

गुंतवलेल्या पैशांवर वार्षिक व्याज देण्याचं आमीष दाखवून श्रीराम इन्व्हेस्टमेंटनं तब्बल ४ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. नोटाबंदीनंतर जानेवारी २०१७ पासून गुंतवणूकदारांना व्याज मिळणं बंद झालं. त्यानंतर गेल्या मार्च महिन्यापासून श्रीराम समुद्र फरार होता. 

आई-वडिलांना जामीन

याप्रकरणी त्याचे वडील सुहास आणि आई सुनीता समुद्र यांनाही अटक झाली होती. मात्र वार्धक्यामुळं त्यांना जामीन मिळाला होता. आता श्रीराम समुद्रला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.