...आणि शरद पवारांनी धरला नारायण राणेंचा हात

Updated: May 27, 2018, 06:52 PM IST

सिंधुदुर्ग : कोकणी माणूस खूप चिकित्सक आहे आणि त्याला एखादी गोष्ट पटली नाही तर तो त्याचा विरोध करतो अशा शब्दांत शरद पवारांनी नाणारच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. निमित्त होतं सिंधुदुर्ग इथल्या लाईफटाईम हॉस्पिटल उदघाटनाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उदघाटन करण्यात आलं.

नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळानं कसाल पडवे इथं सुसज्ज हॉस्पिटल उभारलंय. या कार्यक्रमाला राजकारणातल्या अनेक दिग्गजांनी एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावली. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला हॉस्पिटलचं उदघाटन करून व्यासपीठावर येताना शरद पवार यांनी नारायण राणे यांचा आधार घेतल्याचं पाहायला मिळालं. व्यासपीठावरील पायऱ्या चढताना चक्क शरद पवार यांनी नारायण राणेंचा हात धरला. 

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसपासून थेट शरद पवार यांनी नारायण राणे यांचे भरभरून कौतुक केले. राणेंच्या हातात काम गेलं की ते नेटकं करण्याची त्यांची खासियत आहे असं पवारांनी यावेळी सांगितलं. तर, राणे हे स्वप्न बघणारे नाही तर स्वप्न पूर्ण करणारे नेते आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्तुतीसुमनं उधळलीत.