सोनई तिहेरी हत्याकांड : सहा दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ६ दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

Updated: Jan 20, 2018, 04:27 PM IST
सोनई तिहेरी हत्याकांड : सहा दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा  title=

नाशिक : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ६ दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

गुरुवारी सरकारी वकील आणि दोषींच्या वकीलांमध्ये शिक्षेवर युक्तीवाद करण्यात आला होता. यावेळी दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्व निकम यांनी केली होती. 

नेवासा तालुक्यातल्या सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी इथं 2013च्या जानेवारीत सचिन सोहनलाल, संदीप राजू थनवार आणि राहुल कंडारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

नेवासे फाटा इथल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये हे तिघे कामाला होते. स्वच्छतागृहाची टाकी साफ करायचीय असं सांगून त्यांना विठ्ठलवाडीला बोलावण्यात आलं. धनवार आणि कंडारे यांचा खून करून मृतदेह कोरड्या विहिरीत पुरण्यात आले. तर घारु याचं मुंडकं आणि हातपाय तोडण्यात आले होते. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुर्‍हे यांना दोषी ठरवण्यात आलंय. तर अशोक फलकेला निर्दोष ठरवण्यात आलंय.