एसटी वाहक-चालकाला प्रवाशांसह नागरिकांची बेदम मारहाण

तेल्हारा आगाराच्या बस वाहक आणि चालकाला प्रवाशांसह नागरिकांनी मारहाण केल्याची घटना घडली.

Updated: Sep 8, 2018, 08:41 PM IST
एसटी वाहक-चालकाला प्रवाशांसह नागरिकांची बेदम मारहाण

अकोला : तेल्हारा आगाराच्या बस वाहक आणि चालकाला प्रवाशांसह नागरिकांनी मारहाण केल्याची घटना घडली. तेल्हारा तालुक्यातील आडसुळ फाट्यावर हा प्रकार घडला. यातील आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलीसांनी उशिरा गुन्हे दाखल केले. तेल्हारा आगाराची बस अकोल्यावरून तेल्हाऱ्याकडे येतांना ही घटना घडली.

एका विद्यार्थ्यासोबत वाहकाचा तिकिटावरून वाद झाला. फुल तिकीट काढायला लागेल असे सांगितल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. काही वेळाने बस आडसुळ फाटा येथे आली असता तो विद्यार्थ्याने आपल्या साथीदारांसह कंडक्टर आणि ड्रायव्हरला बसमधून खाली खेचून शिवीगाळ करत मारहाण केली. गावातील काही नागरिकांसह या विद्यार्थ्यानं वाहक सागर मेटांगेसह चालकाला मारहाण केली. यावेळी चालकाच्या हाताला चावा घेण्यात आला आहे. 

दरम्यान, तेल्हारा पोलिसांनी आरोपी धीरज सदानंद नवलकर, देवानंद वासुदेव नवलकर, तानाजी पुनाजी खंडारे आणि इतरांविरूद्ध गुन्हे दाखल केलेत.