इस्लामपूरात राजू शेट्टींचा पुतळा जाळला

 सोलापूर जिल्ह्यात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडी वर झालेल्या दगडफेकीचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले आहेत. इस्लामपुर येथे ख़ासदार राजू शेट्टी यांचा प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. तसेच इस्लामपुर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडण्यात आले.

Updated: Feb 24, 2018, 05:19 PM IST
इस्लामपूरात राजू शेट्टींचा पुतळा जाळला  title=

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडी वर झालेल्या दगडफेकीचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले आहेत. इस्लामपुर येथे ख़ासदार राजू शेट्टी यांचा प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. तसेच इस्लामपुर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडण्यात आले.

या कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि बोर्डची नासधुस करण्यात आली आहे. कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यानी हे आंदोलन केले आहे.

सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर आणि ताफ्यावर दगडफेक झालीय. खोत हे सोलापूर जिल्हा दौ-यावर आलेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही दगडफेक केल्याचं बोललं जातंय. खोत यांचा निषेध करण्यासाठी ही दगडफेक करण्यात आल्याची शक्यता आहे,. मका, गाजर आणि शेती उत्पादन वस्तूंचा खोत यांच्या गाडीवर मारा करण्यात आल्याचं समजतंय. 

दरम्यान विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं असे भ्याड हल्ले करत असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर आणि ताफ्यावर दगडफेक झाली आहे. सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेत.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही दगडफेक केल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान इस्लामपूर येथं राजू शेट्टी यांचे पुतळे जाळल्याचा प्रकारही समोर आलाय.

निषेध करण्यासाठी दगडफेक

सदाभाऊ खोत यांचा निषेध करण्यासाठी ही दगडफेक करण्यात आल्याची शक्यता आहे. मका, गाजर आणि शेती उत्पादन वस्तूंचा खोत यांच्या गाडीवर मारा करण्यात आल्याचं समजतं आहे.