पिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले

पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क ड्रायव्हर नसताना पीएमपीएलची बस धावली आणि तीन गाड्यांना चिरडून एका दुकानात घुसली. त्यामुळे मोठे नुकसान झालेय.

Updated: Sep 12, 2017, 09:58 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले title=

चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क ड्रायव्हर नसताना पीएमपीएलची बस धावली आणि तीन गाड्यांना चिरडून एका दुकानात घुसली. त्यामुळे मोठे नुकसान झालेय.

पीएमपीएमएलचे विचित्र अपघात हे काही नवीन नाही. मात्र, हा अपघात जरा वेगळाच होता. हा अपघात पिंपळे गुरवच्या बस थांब्यावर झाला. चालक खाली उतरलेला असताना या ठिकाणी थांबलेली रिकामी बस अचानक सुरू झाली आणि या बसनं तीन दुचाकी आणि एका गॅरेजचं मोठं नुकसान केलं. 

या प्रकरणी पोलिसांनी युवराज चंद्रकांत कुदळे या बस चालकाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे गुरवच्या शेवटच्या थांब्यावर मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव ही बस थांबली. प्रवासी उतरले बस चालक आणि वाहकही चहासाठी खाली उतरले. 

मात्र, चालकाने बस चालूच ठेवली. काही वेळानं ही रिकामी बस आपोआप पुढे जाऊन जवळ असलेल्या गॅरेजला जाऊन धडकली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.