सनीच्या कार्यक्रमात पत्रकारांना धक्काबुक्की

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन बुधवारी लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित झाली होती. तिच्या कार्यक्रमात पत्रकारांना धक्काबुक्की झाल्यानं हा कार्यक्रम वादात सापडला.

Updated: Jun 1, 2017, 11:36 AM IST
सनीच्या कार्यक्रमात पत्रकारांना धक्काबुक्की  title=

लातूर : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन बुधवारी लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित झाली होती. तिच्या कार्यक्रमात पत्रकारांना धक्काबुक्की झाल्यानं हा कार्यक्रम वादात सापडला.

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तथा पॉर्न स्टार सनी लिओनी काल लातूरमध्ये एका जिमच्या उद्घाटनासाठी आली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सनीनं यावेळी प्रसार माध्यमांशीही संपर्क साधला. 

यावेळी पत्रकार प्रश्न विचारत असताना जिम संचालकाचा सचिन नावाचा सहकारी भडकला. त्याने पत्रकारांना धक्काबुक्कीही केली. यावेळी सनी लिओनीने मध्यस्थी करत शांततेचं आवाहन केलं.

घडल्या प्रकाराबद्दल जिमचे संचालक अविनाश चव्हाण यांनी पत्रकारांची माफी मागितली. परंतु, या घटनेचा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आलाय.