औरंगाबाद महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

औरंगाबाद खंडपीठानं नारेगावमध्ये कचरा टाकू नये असे अंतिम आदेश दिले होते. त्याविरोधात महापालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टातही याचिका फेटाऴण्यात आल्यानं महापालिकेला मोठा धक्का बसलाय.

Updated: Mar 10, 2018, 10:37 AM IST
औरंगाबाद महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका title=

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठानं नारेगावमध्ये कचरा टाकू नये असे अंतिम आदेश दिले होते. त्याविरोधात महापालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टातही याचिका फेटाऴण्यात आल्यानं महापालिकेला मोठा धक्का बसलाय.

न्यायालयाने दिले स्पष्ट आदेश

नारेगावबाबत हायकोर्टानं दिलेला अंतिम आदेश आता कायमस्वरूपी करण्यात आला आहे. आता यापुढं महापालिकेला नारेगावमध्ये थोडाही कचरा टाकता येणार नाही. तर तिथं टाकलेल्या कच-याचीही विल्हेवाट लावावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्हीकडे महापालिकेला जबर धक्का बसलाय.

औरंगाबाद येथील वातावरण तापले

गेले काही दिवस नागरिक आणि प्रशास यांच्यात कचऱ्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. 

दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार औरंगाबाद महापालिकेच्या मदतीला धावून आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी औरंगाबादमध्ये शहरातल्या कचरा प्रश्नावर बैठक घेतली. यामध्ये कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पंचसुत्री ठरवण्यात आली आहे. देशात इंदौर सगळ्याच स्वच्छ शहर आहे, तीथं काम करणा-या एजन्सीची मदत औरंगाबादमधला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात येईल. त्यासाठीचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याचं म्हैसकर यांनी सांगितलं.