पुणेकर दहशतीत, गाड्यांच्या तोडफोडीच सत्र सुरुच

पुण्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न

Updated: Oct 28, 2018, 12:59 PM IST
पुणेकर दहशतीत, गाड्यांच्या तोडफोडीच सत्र सुरुच title=

पुणे : पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीच सत्र सुरुच आहे. शनिवारी रात्री हडपसर इथल्या ससाणेनगर इथं काही जणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवत गाड्याची तोडफोड केली. 

हातात कोयते, तलवारी घेऊन दहशत माजवत सुमारे १० ते १२ दुचाकी, चारचाकी गाड्यांची तोडफोड करत नुकसान केल्याचं समोर येतं आहे. सत्तुर्या उर्फ राजेश नेवसे, ओंकार गिरमे, निखिल तिकोटे, श्रीकांत जाधव, औदुंबर बिराजदार, महेश गायकवाड आणि इतर तिघे यांनी ही तोडफोड केली आहे.

या टोळक्याने धावत्या रेल्वेवरही दगडफेक केली. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. हडपसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.