तेजश्रीमुळे पाचजणांना मिळाले जीवनदान !

नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच स्त्री शक्तीचा महिमा दाखवणारी एक घटना घडली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 21, 2017, 11:05 AM IST
तेजश्रीमुळे पाचजणांना मिळाले जीवनदान !  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच स्त्री शक्तीचा महिमा दाखवणारी एक घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे गावातील शेतकऱ्याची ११ वर्षांच्या मुलीचे ब्रेनडेड झाले आहे. पण पाच रुग्णांना अवयवदान करून तिने जीवनदान दिले आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला पुरवठा कमी झाल्यामुळे तिचे ब्रेनडेड झाले आणि पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

तेजश्री रमेश शेळके असे त्या मुलीचे नाव असून, शिवडेपासून जवळ असलेल्या पांढूर्ली येथील जनता विद्यालयात सहावीत शिकत होती. १५ सप्टेंबर रोजी शाळेच्या मैदानावर फुटबॉलचा सामना पाहत असताना तिला चक्कर आली. उपचारासाठी तिला नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्व तपासण्यांनंतर तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तिच्या नातेवाईकांचे सांत्वन करत त्यांना अवयवदानाची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचजणांना जीवनदान मिळाले असून नवरात्रीच्या सुरवातीलाच स्त्री शक्तीचा महिमा दिसून आला.