राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात, निलम गोऱ्हेंनी सरकारला धरले धारेवर

राज्यातली महानगरं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आलीय. हत्या, दरोडे,बलात्काराच्या मुंबई, ठाणे, पुणे नागपूर, नाशिक या महानगरातल्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट दिसतंय. या प्रश्नावर विधानपरिषदेत आमदार  निलम गोऱ्हेंनी सरकारला धारेवर धरले.

Updated: Dec 15, 2017, 03:57 PM IST
राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात,  निलम गोऱ्हेंनी सरकारला धरले धारेवर  title=

नागपूर : राज्यातली महानगरं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आलीय. हत्या, दरोडे,बलात्काराच्या मुंबई, ठाणे, पुणे नागपूर, नाशिक या महानगरातल्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट दिसतंय. या प्रश्नावर विधानपरिषदेत आमदार  निलम गोऱ्हेंनी सरकारला धारेवर धरले.

खोटे फोन कॉल्स करून पैसे लाटणारी टोळी 

ठाण्यात खोटे फोन कॉल्स करून पैसे लाटणाऱ्यांची एक टोळी काम करतेय. त्याचे जवळपास ५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर पुण्यात मद्यधुंद तरुणांनी तरुणीची छेडछाड करणाऱ्या दोन तरुणांना आज अटक करण्यात आलीय. नाशकात महिलांची तस्करी करणाऱ्या  आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय.

महनगरं सुरक्षित राहिलेली नाहीत 

नागपुरात सध्या पोलिसांची सर्वाधिक संख्या असताना घरफोड्यांचे प्रकार वाढतायत. त्यामुळे महाराष्ट्रातली महनगरं सुरक्षित राहिलेली नाहीत अशी भावना वारंवार व्यक्त होतेय.

सरकारची पडती बाजू

दरम्यान याच मुद्द्यावरून विधानपरिषदेत शिवसेनेच्या प्रतोद निलम गोऱ्हे यांनी सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेतेची स्थिती बिकट असल्यानं सरकारनं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. त्यावर आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देऊन सरकारची पडती बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.