गाडीने अचानक पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू

गाडीने पेट घेतल्याने तिघे जळून खाक झाली. यामध्ये गाडीतल्या तिघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजताची आळे फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. वडगाव आनंद जवळच स्विफ्ट डिझायरमध्ये बसून तिघे जण घरी परत येत होते. तितक्यात गाडीनं पेट घेतला.

Updated: Aug 23, 2017, 10:48 AM IST
गाडीने अचानक पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू title=

पुणे : गाडीने पेट घेतल्याने तिघे जळून खाक झाली. यामध्ये गाडीतल्या तिघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजताची आळे फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. वडगाव आनंद जवळच स्विफ्ट डिझायरमध्ये बसून तिघे जण घरी परत येत होते. तितक्यात गाडीनं पेट घेतला.

मृत्यू पावलेले तिघेही वैद्यकीय व्यवसायात होते. घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या येणारं एकही वाहन मदतीला धावून आलं नाही. जर वेळीच मदत मिळाली असती, तर कदाचित तिघांचे प्राण वाचवता आले असते.

पाहा व्हिडिओ