दाभोलकर हत्या प्रकरण : अंदुरेच्या दोन मेव्हण्यांसह तिघांना अटक

काल रात्री अटक झालेल्या तिघांना आज औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

Updated: Aug 22, 2018, 09:35 AM IST
दाभोलकर हत्या प्रकरण : अंदुरेच्या दोन मेव्हण्यांसह तिघांना अटक

औरंगाबाद : दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये एटीएसनं अजिंक्य सुरळे, शुभम सुरळे आणि रोहित रेगे या तिघांना काल दुपारीच ताब्यात घेतलं होतं. झडतीत त्यांच्या घरातून एक बंदूक आणि काही काडतुसं जप्त करण्यात आली. त्याआधारे या तिघांवर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

अटकेतल्या तिघांपैकी अजिंक्य आणि शुभम हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत... आणि दाभोलकरांवर गोळी झाडण्याच्या आरोपात गजाआड असलेल्या सचिन अंदूरेचे मेव्हणे आहेत.

काल रात्री अटक झालेल्या तिघांना आज औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दाभोलकरांची हत्या...

सीबीआयने शनिवारी अंदुरेला अटक केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेही गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली आहे. १९ ऑगस्ट २०१३ रोजी कळसकर आणि अंदुरे यांनी औरंगाबादहून पुण्यासाठी बस पकडली. २० ऑगस्टला सकाळी दोघे शिवाजी नगरमध्ये पोहोचले. ओंकारेश्वर मंदिराजवळ त्यांनी बाईक घेतली. ६ वाजून ४० मिनिटांनी दोघेही बाईकवरुन ओकांरेश्वर पुलावर पोहोचले. दाभोलकर ७.१० वाजता पुलावर पोहोचले. त्यांच्यावर कळसकरनं त्यांच्यावर दोन तर अंदुरेनं एक गोळी झाडली.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close