'सुवर्ण गणेश दरोडा'प्रकरणी आज निकाल

संपूर्ण राज्‍याला हादरवून टाकणारा हा प्रकार सीसीटीव्‍हीत कैद झाला होता. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2017, 12:22 PM IST
'सुवर्ण गणेश दरोडा'प्रकरणी आज निकाल  title=

रायगड : रायगड जिल्‍हयातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश दरोडा आणि दोघांच्‍या खून खटल्‍याचा निकाल आज जाहीर होणार आहे. रायगडचे विशेष मोका न्‍यायाधीश किशोर पेटकर यांच्‍या न्‍यायालयात याची सुनावणी सुरू होती. त्यामूळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

 २४ मार्च २०१२ रोजी रात्रीच्‍या सुमारास दिवेआगरच्‍या गणेश मंदिरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी इथली सव्‍वा किलो वजनाची सोन्‍याची गणेशमूर्ती पळवून नेली. या घटनेनंतर रायगड परिसरात खळबळ माजली होती. दरम्यान तिथं रखवालीसाठी असलेले महादेव घडशी आणि अनंत भगत या दोन ग्रामस्‍थांचा पहारीने डोक्‍यात प्रहार करून खून करण्‍यात आला होता. 
संपूर्ण राज्‍याला हादरवून टाकणारा हा प्रकार सीसीटीव्‍हीत कैद झाला होता. पोलीसांनी मोठया शिताफीने तपास करून एकूण बारा आरोपींना ताब्‍यात घेतले. आरोपींमध्‍ये ३ महिला आणि दोन सराफांचाही समावेश आहे. आरोपींकडून गणेशमूर्तीचे वितळवलेले १ किलो २४६ ग्रॅम ४३० मिलीग्रॅम सोनेदेखील हस्‍तगत करण्‍यात आले होते.