पोलिसांच्या मारहाणीत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, कुुटुंबीयांचा आरोप

पोलिसांच्या मारहाणीत चालकाचा मृत्यू झाल्याने तणाव. कुटुंबीयांचा पोलिसांवर थेट आरोप.

Updated: Nov 5, 2018, 02:57 PM IST
पोलिसांच्या मारहाणीत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, कुुटुंबीयांचा आरोप title=

सातारा : ट्रॅक्टरमधील गाण्याचा आवाज वाढल्याने पोलिसांच्या मारहाणीत चालकाचा मृत्यू झाला. ही घटना माढा येथे घडल्यानंतर तणावाचे वातावरण होते. साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधील टेपचा आवाज वाढला. यावेळी झालेल्या वाद झाला. गाण्याचा आवाज कमी करण्यास पोलिसांनी सांगितले. मात्र, आवाज कमी न करता पोलिसांशी वाद घातला. यावेळी पोलिसांनी त्याला मारहाण केली. यात टॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रदीप कल्याण कुटे हा 24 वर्षांचा चालक होता. त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. हा चालक उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील  सोनगिरी येथील रहिवासी आहे. ऊस घेवून तो मानेगाव येथून येत असताना ट्रक्टरमधील गाण्याचा आवाज जास्त असल्याने मानेगाव चौकीतील पोलिसांशी त्याची वादावादी. यावेळी पोलिसांनी त्याला त्याला मारहाण केली, असा दावा मृताच्या नातेवाईकांनी केलाय.

दरम्यान, पोलिसांनी अाकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, प्रदीपच्या आई आणि पत्नीने हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करुन मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी माढा पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती. या घटनेनंतर माढा येथे तणावाचे वातावरण होते.