उद्धव ठाकरे यांची मोदी, राज्य सरकारवर सडकून टीका

  जो शेतकऱ्यांना छळतो तो, स्वराज्याचा दुष्मन, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल चढवला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 26, 2017, 12:07 AM IST
उद्धव ठाकरे यांची मोदी, राज्य सरकारवर सडकून टीका title=

सांगली :  जो शेतकऱ्यांना छळतो तो, स्वराज्याचा दुष्मन, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल चढवला.

मोदींवर जोरदार टीका

मोदींवर टीका करताना उद्धव म्हणालेत, अच्छे दिन येतील, या सारखी निवडणुकीत खोटी आश्वसन दिली जातात, ही कसली फालतू लोकशाही आहे. खालच्या पातळीवरील राजकारण गुजरातमध्ये करत आहात, हार्दिककची सीडी काय दाखवता ? तुम्ही १५ वर्षांत काय विकास केला याची सीडी दाखवा की, असे थेट आव्हान भाजप आणि मोदींना उद्धव यांनी दिले.

नोट बंदीमुळे दहशतवाद कमी झाला नाही, उलट दहशतवाद वाढला, जवान लढत आहेत, म्हणून दहशतवाद थांबतो, तो काय नोटबंदीमुळे नाही. तसेच  हार्दिक पटेल याने यांच्या नाकात दम आणलाय, त्याच्यामुळे स्वतःला बलवान समजणारे घाबरलेत, पंतप्रधान हे 50 सभा घेणार आहेत, हा नैतिक पराभव नाही काय, असा थेट सवालही उपस्थित केला.

भाषणातील ठळक मुद्दे

-  मी शिवरयांच्या भगव्याशी प्रामाणिक आहे, सत्तेशी बांधील नाही, तुम्हाला जे झेपत नाही ते, मी करतोय, त्यामुळे शरद पवार आमच्यावर का टीका करत आहेत, स्वतःच्या पक्षात राहून, वसंतदादांच्या पाठीत खनजीर खुपसणारे तुमच्या सारखे दुसरे नेते आम्ही पाहिले नाहीत - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  

- जो शेतकऱ्यांना छळतो तो, स्वराज्याचा दुष्मन , सांगलीतील अनिकेत खून प्रकरण किती गंभीर आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही, त्यांच्याकडे गृहखाते आहे, हे बेशरम सरकार आहे :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 

- हार्दिक पटेल याने यांच्या नाकात दम आणलाय, त्याच्यामुळे स्वतःला बलवान समजणारे घाबरलेत, पंतप्रधान हे 50 सभा घेणार आहेत, हा नैतिक पराभव नाही काय ?  

- अच्छे दिन येतील, या सारखी निवडणुकीत खोटी आश्वसन दिली जातात, ही कसली फालतू लोकशाही आहे   

- शिवरायांच्या नावाखाली आम्ही घोटाळा सहन करणार नाही, कर्ज मुक्तीला शिवरायांचे नाव तुम्ही दिले आहात, जर यात घोटाला केला तर याद राखा, तुमची गाठ शिवसैनिक आणि जनतेशी आहे - उद्धव ठाकरे

- खालच्या पातळीवरील राजकारण गुजरातमध्ये करत आहात, हार्दिककची सीडी काय दाखवता ? तुम्ही १५ वर्षांत काय विकास केला याची सीडी दाखवा की   

- नोट बंदीमुळे दहशतवाद कमी झाला नाही, उलट दहशतवाद वाढला, जवान लढत आहेत, म्हणून दहशतवाद थांबतो, तो काय नोटबंदीमुळे नाही  

- सर्व पक्ष एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी लढूया, पण तुमच्यात ती हिम्मत नाही ,  शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, मात्र ते क्रिकेट बद्दल बोलतात,  हे दुर्दैवी आहे