कर्मचाऱ्याला 'अजब' शिक्षा देणं नगराध्यक्षांच्या अंगलट

कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका  

Updated: Aug 31, 2018, 03:57 PM IST
कर्मचाऱ्याला 'अजब' शिक्षा देणं नगराध्यक्षांच्या अंगलट  title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याला दिलेली शिक्षा नगराध्यक्षांच्या चांगलीच अंगलट आली. भाजपच्या नगराध्यक्ष जोत्स्ना चराटी यांनी या कर्मचाऱ्याला दिवसभर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्याला नमस्कार करण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा त्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली. 

शिक्षा भोगत असताना या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका आला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

या संदर्भात नगराध्यक्षांकडे विचारणा केली असता अशी कोणतीही शिक्षा केली नसल्याचं सांगत जबाबदारी झटकण्याचा त्यांनी प्रयत्न केला.