विधान परिषदेसाठी शिवसेनेला भुज'बळ', भाजप-राष्ट्रवादी सपाट

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचं रहस्य उलगडलं.  

Updated: May 24, 2018, 02:55 PM IST
विधान परिषदेसाठी शिवसेनेला भुज'बळ', भाजप-राष्ट्रवादी सपाट

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट आज करण्यात आलाय. दराडेंनी स्वतः निवडणुकीनंतर त्याच्या विजयाचं रहस्य उलगडलं. शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणार होता. पण भाजपनं शिवसेनेला पाठिंबा न देता राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभी केली. त्याला उत्तर म्हणून सेनने भुजबळांशी संधानं बांधलं आणि सारं काही घडून आलं. 

म्हणून भाजपची राष्ट्रवादीला साथ

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपविरोधात शिवसेना निवडणूक लढवत असल्याने भाजपने शिवसेनेला विधान परिषद निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी चंग बांधला. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रवादीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र, राष्ट्रवादीला मदत करुनही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला नाही. त्यामुळे शिवसेनेने व्युहरचना करुन भाजपला चांगलाच झटका दिलाय. मात्र, भाजपने कोकणात आपला डाव साधला. शिवसेनेला मदत न करता राष्ट्रवादीला मदत केली. भाजपच्या मदतीबरोबरच शिवसेना विरोधात ज्येष्ठ नेते नारायण राणे मैदानात उतरले. त्यांनीही राष्ट्रवादीचे उमेदावर अनिकेत तटकरे यांना मदत केली आणि शिवसेनेला पराभवाचा धक्का दिला.

कोकणातही भाजपची ही चाल

दरम्यान, विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होत आहेत. परभणीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झालेत. तर कोकणात सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा विजय झालाय. त्यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव केलाय. तिकडे अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठा विजय मिळवलाय.. तिकडे वर्धा-चंद्रपूरमध्ये भाजपचे रामदास आंबटकर यांचा विजय झालाय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close