कोकणात शिवसेनेला राणे-भाजपचा दे धक्का, तटकरे विजयी

विधान परिषद निवडणुकीत कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Updated: May 24, 2018, 11:47 AM IST
कोकणात शिवसेनेला राणे-भाजपचा दे धक्का, तटकरे विजयी title=

रत्नागिरी : विधान परिषद निवडणुकीत कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यामुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजपनेही राष्ट्रवादीला मदत करत शिवसेनेवरचा राग व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झालेत. शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे यांचा पराभव झाला.

कोकणात सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा विजय झालाय. त्यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव केलाय. तिकडे अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठा विजय मिळवलाय.. तिकडे वर्धा-चंद्रपूरमध्ये भाजपचे रामदास आंबटकर यांचा विजय झालाय. 

दरम्यान,  तिकडे नाशिकमध्ये शिवसेनेचे दराडे विजयी झालेत. तर परभणी-हिंगोलीत शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी बाजी मारली. तर दुसरीकडे अमरावतीत काँग्रेसला धक्का देत भाजपच्या प्रवीण पोटेंनी बाजी मारली. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होत आहेत. परभणीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झालेत. तर नाशिकमध्येही शिवसेनेचे नरेंद्र दराडें विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.