भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड

महत्वाच्या पदांवर मराठी माणूस निवडून आलं आहे. 

Updated: Jan 2, 2018, 04:43 PM IST
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड title=

नवी दिल्ली : महत्वाच्या पदांवर मराठी माणूस निवडून आलं आहे. 

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड झालीय. भारताला लाभलेला सांस्कृतिक ठेवा जगभरात पोहोचवून त्याचं रक्षण करण्यासाठी सहस्त्रबुद्धे यांनी त्रिसूत्री आखली आहे.
सहस्त्रबुध्दे यांच्या निवडीमुळे आता देशाचे संबंध कसे सुधारतील याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या अगोदर अनेकदा कलाकारांनी आणि लेखकांनी सरकराचे पुरस्कार परत केले होते. यांची नाराजी कशी दूर करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं. आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. पण पुरस्कार वापसी, लेखकांचा रोष याबाबत सहस्त्रबुद्धे नेमकं काय पाऊल उचलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत.