मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उद्या मतदान

मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उदया मतदान होत आहेत. प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. सर्व EVM मशिन मतदान केंद्रांवर नेण्यात आल्या आहेत.

Updated: Aug 20, 2017, 09:55 AM IST
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उद्या मतदान title=

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उदया मतदान होत आहेत. प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. सर्व EVM मशिन मतदान केंद्रांवर नेण्यात आल्या आहेत.

उद्या सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. मीरा  भाईंदर महापालिकेत एकूण ५ लाख ९३ हजार ३३६ मतदार आहेत. 

निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून 9 निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. एकूण ७७४ मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यातील १०१ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.