रायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल

हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्यानं, रायगडकरांना थंडीची चाहूल लागली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. हवेतल्या गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे.

Updated: Nov 15, 2017, 05:30 PM IST
रायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल title=

रागड : हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्यानं, रायगडकरांना थंडीची चाहूल लागली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. हवेतल्या गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे.

जिल्ह्यातल्या महाड, माणगाव, पोलादपूर, इंदापूर भागात सर्वत्र धुकं पसरलेलं पाहायला मिळालं. डोंगर भागात धुक्याचं प्रमाण अधिक होतं. मुंबई गोवा महामार्गावर धुकं असल्यानं, सकाळी वाहनांना दिवे लावून प्रवास करावा लागत होता. रायगडमधलं तापमान सध्या 14 ते 15 अंश सेल्सियस इतकं खाली उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे.