धक्कादायक! जळगावात चारित्रेच्या संशयावरुन महिलेला जिवंत जाळलं

Updated: May 16, 2018, 08:24 PM IST

जळगाव : जळगाव जवळच्या शिरसोली गावात अंगाचा थरकाप होईल अशी धक्कादायक घटना घडलीय. चारित्र्याच्या संशयावरून ४२ वर्षीय महिलेला जवळच्याच लोकांनी अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिलंय.

या घटनेत पीडित महिला ८२ टक्के भाजलीये. तिच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

आठ वर्षांपूर्वीही धरणगाव तालुक्यातील नांदेड गावात महिलेला विवस्त्र करुन भर चौकात जमावानं मारहाण केली होती.  या घटनेतील १९ आरोपींना नुकतीच न्यायालयानं कारावासाची शिक्षा ठोठवलीय. शिरसोलीच्या घटनेतही पोलीस अशी कारवाई करतील का याकडं सर्वांचं लक्ष लागलाय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close