कल्याण रेल्वे स्थानकात महिला रुळामध्ये अडकल्याने गाड्यांचा खोळंबा

 कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड नसून महिला रुळामध्ये अडकल्यानं खोळंबा झाल्याचं आता पुढे आलंय या महिलेला रुळामधून जिवंत काढण्याचे जवळपास तासभर प्रयत्न झाले. पण त्यात यश आलं नाही. 

Updated: Dec 26, 2017, 08:31 AM IST
कल्याण रेल्वे स्थानकात महिला रुळामध्ये अडकल्याने गाड्यांचा खोळंबा title=

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड नसून महिला रुळामध्ये अडकल्यानं खोळंबा झाल्याचं आता पुढे आलंय या महिलेला रुळामधून जिवंत काढण्याचे जवळपास तासभर प्रयत्न झाले. पण त्यात यश आलं नाही. महिलेचा मृतदेह आता बाहेर काढण्यात आलाय.

बदलापूरमध्येही बिघाड

दरम्यान, ६.२३ च्या बदलापूर लोकलमध्ये प्लॅटफॉर्म नंबर ४ वर झाला बिघाड. लोकलमधील बिघाड दूर करण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरु आहे.

मुंबई -पुणे इंद्रायणी उशिराने

या बिघाडामुळे बिघाडामुळे मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस उशिराने धावत आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरून वाहतूक सुरू आहे. मात्र ४ नंबर बंद असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशिर होत आहे.